राज्याच्या कला शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा 2025 चे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ही परीक्षा 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान होणार असून, विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी 21 जुलै ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

फक्त एकाच परीक्षेसाठी नोंदणी शक्य
शासकीय रेखा कला परीक्षा म्हणजेच ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फक्त एकाच श्रेणीसाठी (एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट) नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे फॉर्म भरताना परीक्षा निवडताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांचे नाव जनरल रजिस्टरप्रमाणेच टाका
नोंदणी करताना विद्यार्थ्यांचे नाव जनरल रजिस्टर (सर्वसाधारण नोंदवही) प्रमाणे अचूक भरणे अत्यावश्यक आहे. चुकीची नोंद झाल्यास शाळा व विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. नावामध्ये स्पेलिंग चूक, अपूर्ण माहिती टाळावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
ऑनलाइन नोंदणीसाठी अधिकृत वेबसाइट
विद्यार्थ्यांची नोंदणी, परीक्षा केंद्राची नोंदणी व परीक्षा शुल्क भरताना अधिकृत संकेतस्थळ https://www.msbae.ac.in किंवा https://dge.msbae.in या लिंकवर जाऊन ऑनलाईन प्रक्रियेने अर्ज भरावा. याशिवाय कोणत्याही इतर संकेतस्थळावरून अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
एलिमेंटरी परीक्षेचा तपशीलवार वेळापत्रक
एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षेतील
- वास्तूचित्र विषय – २४ सप्टेंबर, सकाळी १०.३० ते दुपारी १
- स्मरणचित्र विषय – २४ सप्टेंबर, दुपारी २ ते ४
- संकल्पचित्र व नक्षीकाम – २५ सप्टेंबर, सकाळी १०.३० ते १
- कर्तव्य भूमिका व अक्षरलेखन – २५ सप्टेंबर, दुपारी २ ते ४
या वेळापत्रकानुसार परीक्षा घेण्यात येणार आहे.
इंटरमिजिएट परीक्षा – दोन दिवसीय स्वरूपात
इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षा २६ व २७ सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे. या परीक्षेसाठीचे स्वतंत्र वेळापत्रक संबंधित वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात येईल.
नोंदणीसाठी मुदतवाढ नाही!
या परीक्षेसाठी नोंदणीची अंतिम तारीख २४ ऑगस्ट २०२५ असून, १२ सप्टेंबरनंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही, हे स्पष्टपणे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे.
कला अभ्यासक्रमातील पुढील टप्प्यासाठी महत्त्वाची परीक्षा
ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याचे मूल्यमापन करणारी असून, पुढील शैक्षणिक टप्प्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. अनेक डिझाइन, अॅनिमेशन आणि आर्ट संबंधित कोर्सेसमध्ये या परीक्षेचे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.

Comments are closed.