सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी मोठी बातमी! प्रसार भारती दूरदर्शन केंद्र, हैदराबाद यांनी ब्रॉडकास्ट असिस्टंट, कॉपी एडिटर आणि इतर अनेक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 21 नोव्हेंबर 2025 पासून सुरू असून 15 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता. विशेष म्हणजे अर्जासाठी कोणतेही शुल्क नाही.

या भरतीमध्ये तेलुगू व उर्दू न्यूज रीडर, व्हिडिओ एडिटर, असिस्टंट न्यूज एडिटर, कॉपी एडिटर, असिस्टंट वेबसाइट एडिटर आणि ब्रॉडकास्ट असिस्टंट अशा विविध पदांचा समावेश आहे. नियुक्ती दररोजच्या मानधनावर केली जाणार असून, मानधन ₹1500 ते ₹2400 प्रति दिवस असेल. पदांची संख्या घोषित केलेली नसली तरी ही पदे मीडिया क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठित मानली जातात.
पात्रता व वयोमर्यादा
उमेदवारांकडे पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक. वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे असून नियमांनुसार सवलत लागू आहे.
निवड प्रक्रिया
लिखित परीक्षा (MCQ/वर्णनात्मक), मुलाखत, स्क्रीन टेस्ट/ऑडिशन, व्हॉईस टेस्ट, संगणक परीक्षा, ग्रुप डिस्कशन, एडिटिंग सॉफ्टवेअर टेस्ट इत्यादी टप्प्यांद्वारे अंतिम निवड होईल.
अर्ज कसा करावा?
निर्धारित अर्ज फॉर्म (Annexure I-A) सोबत शैक्षणिक प्रमाणपत्रे, जन्मतारीख प्रमाणपत्र, पत्ता पुरावा, अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) जोडून स्पीड पोस्ट, हातोने, ऑनलाइन फॉर्म किंवा ई-मेल द्वारे पाठविता येईल. पोस्टल विलंबाबद्दल विभाग जबाबदार राहणार नाही. इच्छुक उमेदवारांनी तपशीलवार CV जोडू शकतात, परंतु निर्धारित फॉर्म अनिवार्य आहे.
मीडिया, पत्रकारिता आणि प्रसारण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी प्रसार भारतीची ही भरती उत्तम संधी आहे. इच्छुकांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज करून संधी पकडावी.

Comments are closed.