गुण नव्हे, विचार महत्त्वाचा!-Don’t Just Chase Marks!

Don’t Just Chase Marks!

विदर्भातले सुपुत्र आणि भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून म्हटलं की, फक्त गुण मिळवण्यावर नाही, तर चौकस विचार करण्यावर भर द्या. शिक्षण फक्त परीक्षा पास होण्यासाठी नाही, तर समाज घडवण्यासाठी असायला हवं.

Don’t Just Chase Marks!पणजी येथील व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी सांगितलं की, पाच वर्षांचा कायद्याचा अभ्यासक्रम आल्यापासून शिक्षणव्यवस्थेत खूप मोठा बदल झाला आहे.

गवई यांनी तरुण वकिलांच्या ज्ञानाचं विशेष कौतुक केलं आणि म्हटलं, “अनुभवी वकिलांनीही या नव्या पिढीकडून काहीतरी शिकायला हवं.” तसंच कमी वेतन, शिक्षणातील अडचणी आणि वकिलांपुढील इतर समस्या यावरही त्यांनी स्पष्टपणे मत मांडलं.

त्यांनी स्वतःच्या महाविद्यालयीन आठवणीही सांगितल्या – “वर्ग चुकवायचो, पण अभ्यासात एकाग्र राहायचो – म्हणून आज इथवर पोचलो.”

गवई यांनी उद्योजक व्ही. एम. साळगावकर यांच्या सामाजिक योगदानाचं कौतुक केलं आणि गोव्यातील न्यायव्यवस्थेच्या विकासात या महाविद्यालयाच्या भुमिकेचं महत्त्व अधोरेखित केलं.

Comments are closed.