सरकारी वीज क्षेत्रातील प्रतिष्ठित नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेमध्ये भरतीची मोठी संधी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा न घेता एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी थेट निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे.
ज्यांना परीक्षेविना सरकारी नोकरी हवी आहे, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरू शकते. इच्छुक उमेदवारांना १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
या भरतीअंतर्गत एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (Electrical/Mechanical) या पदांसाठी १८ जागा, सिव्हिल शाखेसाठी १० जागा आणि IT शाखेसाठी २ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ही पदे E-2 ग्रेड मध्ये असून उत्कृष्ट वेतनमान आणि प्रगतीची संधी दिली जाणार आहे.
पात्रतेच्या निकषांनुसार, उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी/AMIE पदवी असावी. संबंधित शाखेत किमान ६५ टक्के गुण (SC/ST साठी ५५%) आवश्यक आहेत. तसेच उमेदवारांनी Aptitude Test in Engineering (GATE) मध्ये पात्र ठरलेले असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पडेल. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ recruitment.neepco-spark.co.in येथे भेट देऊन “Current Openings” विभागात संबंधित पदासाठी “Register” पर्याय निवडावा. त्यानंतर आवश्यक माहिती भरून नोंदणी करा, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा. शेवटी, अर्जाचा प्रिंटआउट काढून सुरक्षित ठेवा.
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे थेट निवड पद्धतीने होणार असून कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. त्यामुळे पात्र उमेदवारांनी विलंब न करता अर्ज प्रक्रिया पूर्ण करून सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी साधावी

Comments are closed.