सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. परीक्षा किंवा मुलाखतीचा ताण न घेता थेट केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
इंडिया पोस्टने 2026 साठी ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीबाबत मोठे अपडेट जाहीर केले असून, देशभरात 25 हजारांहून अधिक पदे भरली जाणार आहेत.
या भरतीची खास बाब म्हणजे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असून, उमेदवारांना घरबसल्या अर्ज करता येणार आहे. भारतीय डाक विभागाने काही दिवसांपूर्वी या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र असून, निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणांवर आधारित असणार आहे.
महत्वाचे तपशील – GDS भरती 2026
- पदे: ग्रामीण डाक सेवक (GDS), शाखा पोस्टमास्टर (BPM), सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)
- एकूण जागा: सुमारे 28,740 (संपूर्ण भारतात)
- पात्रता: 10वी उत्तीर्ण (गणित व इंग्रजी विषय अनिवार्य)
- वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे: SC/ST: 5 वर्षे सूट & OBC: 3 वर्षे सूट
- निवड प्रक्रिया: 10वीच्या गुणांवर आधारित थेट मेरिट लिस्ट
- पगार: ₹10,000 ते ₹29,480 (7 वा वेतन आयोग)
महत्वाच्या तारखा (अंदाजे)
- अधिसूचना प्रसिद्ध: 31 जानेवारी 2026
- ऑनलाईन अर्ज सुरू: 31 जानेवारी 2026
- अर्जाची अंतिम तारीख: 14 फेब्रुवारी 2026
- मेरिट लिस्ट: 20 ते 28 फेब्रुवारी 2026
आवश्यक अटी
- स्थानिक भाषेचे (मराठी) ज्ञान आवश्यक
- बेसिक संगणक प्रमाणपत्र अपेक्षित
- सायकल चालवता येणे बंधनकारक
टीप: जनरल व OBC उमेदवारांसाठी ₹100 अर्ज शुल्क असून, महिला व SC/ST उमेदवारांसाठी अर्ज शुल्क माफ आहे.

Comments are closed.