आता नागरिकांना ई-सर्च आणि ‘आपले सरकार’ प्रणालीद्वारे काढण्यात येणाऱ्या नोंदणीकृत दस्तांवर डिजिटल स्वाक्षरी मिळणार आहे. यामुळे सरकारी कामांसाठी स्वतंत्र कार्यालयात जाण्याची गरज नाही.
‘ई-प्रमाण’ प्रणालीची सुरुवात:
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘ई-प्रमाण’ ही नवीन सुविधा विकसित केली असून, प्रायोगिक तत्त्वावर सातारा जिल्ह्यापासून सुरु होणार आहे. या सुविधेत 1985 पासूनचे दस्त उपलब्ध करून दिले जातील.
डिजिटल स्वाक्षरीची सोय:
दर पानावर संबंधित दुय्यम निबंधकांची डिजिटल स्वाक्षरी असेल. नागरिक एसएमएसद्वारे किंवा लॉगिनमध्ये डाउनलोड लिंक मिळवू शकतात. ‘ग्रीन टिक’ किंवा ‘डिजिटल टिक’ वापरून दस्ताची सत्यता सहज तपासता येईल.
कसे मिळेल दस्त:
ई-सर्व्हिसेस किंवा आपले सरकार पोर्टलवर अर्ज केल्यावर दुय्यम निबंधक डिजिटल स्वाक्षरी करतील. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या नोंदणीकृत डिजिटल दस्तांची प्रत मिळणार आहे. ही सुविधा राज्य सरकारच्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत उपलब्ध होईल.