१५ रुपयांत घरबसल्या डिजिटल ७/१२!-Digital 7/12 Extract at Home for ₹15!

Digital 7/12 Extract at Home for ₹15!

राज्य सरकारने डिजिटल सातबारा उताऱ्याला अधिकृत मान्यता दिल्याने नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. आता जमिनीच्या व्यवहारांसाठी लागणारा सातबारा उतारा केवळ १५ रुपयांत ऑनलाइन मिळणार असून, तो घरबसल्या काही मिनिटांत मोबाईलवर डाउनलोड करता येणार आहे.

Digital 7/12 Extract at Home for ₹15!या डिजिटल उताऱ्यांवर क्यूआर कोड, डिजिटल स्वाक्षरी आणि १६ अंकी पडताळणी क्रमांक असल्याने तलाठ्याची सही किंवा शिक्क्याची आवश्यकता उरलेली नाही.

हे उतारे सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग तसेच न्यायालयीन कामांसाठी वैध असतील. त्यामुळे कार्यालयांचे फेरे, चावडीवरील प्रतीक्षा आणि वेळेची नासाडी पूर्णपणे टळणार आहे.

महाभूलेख (भूलेख) या अधिकृत संकेतस्थळावरून शेतकरी सातबारा, आठ-अ, फेरफार उतारा आणि प्रॉपर्टी कार्डही ऑनलाइन मिळवू शकतात. सोपी नोंदणी, ओटीपी-आधारित लॉगइन आणि डिजिटल पेमेंट सुविधेमुळे ही प्रक्रिया सर्वसामान्यांसाठी अधिक सुलभ झाली आहे. या निर्णयामुळे शेतकरी व नागरिकांना पारदर्शक, जलद आणि विश्वासार्ह सेवा मिळणार आहे.

Comments are closed.