TET मध्ये दिलासा देण्याची मागणी!-Demand for TET Relaxation!

Demand for TET Relaxation!

राज्यातील शिक्षकांच्या टीईटी परीक्षेसंदर्भात शिक्षक परिषदेकडून सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. वरिष्ठ शिक्षकांना दिलासा मिळावा यासाठी नियमांमध्ये बदल करण्याची मागणी जोर धरत आहे.

Demand for TET Relaxation!शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची भेट घेऊन प्रतिनिधीमंडळाने टीईटी/सीटीईटी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुणांमध्ये सवलत द्यावी असा प्रस्ताव मांडला. विशेषतः १५ वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्या शिक्षकांसाठी किमान गुण ४५% करण्याची मागणी करण्यात आली.

सध्या पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक असल्याने अनेक अनुभवी शिक्षक अडचणीत येत आहेत. त्यामुळे अशा शिक्षकांना आधी पदोन्नती देऊन नंतर परीक्षा पास होण्यासाठी दोन वर्षांची मुदत द्यावी अशीही सूचना करण्यात आली.

तामिळनाडूच्या धर्तीवर नियम सुलभ करण्याची मागणी करण्यात आली असून, या विषयावर सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवल्याचे समोर आले आहे.

Comments are closed.