पीएसआयसाठी वय सवलतीची मागणी!-Demand for Age Relaxation in PSI Exam!

Demand for Age Relaxation in PSI Exam!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ अंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी उमेदवारांना एक वर्षाची वयोमर्यादा सवलत द्यावी, अशी ठोस मागणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

Demand for Age Relaxation in PSI Exam!पीएसआय पदासाठीची जाहिरात जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध झाली असली, तरी ती नियोजित वेळेपेक्षा तब्बल सात महिने उशिरा आल्याने अनेक इच्छुक उमेदवार वयोमर्यादेबाहेर ठरत आहेत. सध्या वयोमर्यादा ग्राह्य धरण्यासाठी १ नोव्हेंबर २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या तारखेच्या अटीमुळे मोठ्या संख्येने उमेदवार अपात्र होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे.

यापूर्वीही अशाच प्रकारे जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाने एक वर्षाची वय सवलत दिल्याची उदाहरणे असून, पोलिस शिपाई भरतीमध्येही यंदा वयोमर्यादेत सवलत देण्यात आली होती.

हीच बाब लक्षात घेऊन पीएसआय परीक्षेसाठी उमेदवारांना एक वर्षाची सवलत द्यावी किंवा वयोमर्यादा ग्राह्य धरण्याच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Comments are closed.