नोकरीच्या शोधात तरुणांसाठी मोठी संधी – सायबरसुरक्षेत भरतीचा पूर! | Cybersecurity Hiring Boom Ahead!

Cybersecurity Hiring Boom Ahead!

देशभरात आयटी क्षेत्रात मंदी आणि कर्मचारी कपात सुरू असताना, सायबरसुरक्षा क्षेत्र मात्र उलट दिशेने वेगाने वाढत आहे. रूब्रिक झिरो लॅब्सच्या अहवालानुसार, पुढील एका वर्षात जवळपास ९०% भारतीय कंपन्या सायबरसुरक्षा प्रोफेशनल्सची भरती करण्याच्या तयारीत आहेत. कंपन्यांवरील वाढत्या सायबर हल्ल्यांमुळे महत्त्वाचा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशिक्षित तज्ज्ञांची मागणी जबरदस्त वाढली आहे.

Cybersecurity Hiring Boom Ahead!

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एआय-आधारित तंत्रज्ञान वेगाने वाढत असल्याने मानवी तसेच मशीन ओळख व्यवस्थापन ही कंपन्यांसाठी आता मोठी गरज बनली आहे. ‘आइडेंटिटी क्रायसिस’ या अहवालानुसार, देशातील CIO आणि CISO यांचे लक्ष आता ओळख-आधारित सायबर धोक्यांना रोखण्यावर केंद्रित झाले आहे. हा अहवाल मोठ्या कंपन्यांमधील 1,625 आयटी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे.

सायबर सिक्युरिटी क्षेत्रातील नोकऱ्यांची मागणी झपाट्याने वाढत असून, येत्या काळात ३५ लाखांपर्यंत नवीन नोकऱ्या निर्माण होऊ शकतात असा अंदाज वर्तवला जातो. कंपन्या कुशल उमेदवारांना टिकवून ठेवण्यासाठी चांगला पगार, बोनस आणि विविध फायदे देत आहेत. डिजिटायझेशन वाढत असल्याने या क्षेत्रात करिअरची संधी इतर सर्व क्षेत्रांपेक्षा अधिक वेगाने विस्तारत आहे.
सायबर सिक्युरिटीचे शिक्षण आज बी.टेकसह विविध अभ्यासक्रमांत उपलब्ध आहे.

या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी सायबर सिक्युरिटी अ‍ॅनालिस्ट, एथिकल हॅकर, पेनेट्रेशन टेस्टर, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजर अशा पदांवर उत्कृष्ट संधी उपलब्ध आहेत. तसेच ISRO, DRDO सारख्या सरकारी संस्थांमध्येही सायबरसुरक्षा तज्ज्ञांची मागणी वाढत आहे. त्यामुळे तुमच्याकडे या क्षेत्रातील डिग्री असल्यास, रेझ्युमे अपडेट करून तयार ठेवा आणि सुवर्णसंधीचा फायदा घ्या!

Comments are closed.