केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत होणाऱ्या सी-टीईटी (CTET) परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 8 फेब्रुवारी 2026 रोजी ही परीक्षा घेण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांना 18 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी आहे.
नुकत्याच पार पडलेल्या राज्य TET परीक्षेनंतर देशभरातील शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण होणे बंधनकारक झाल्यामुळे या परीक्षेला मोठी मागणी वाढली आहे.
सी-टीईटी परीक्षा देशभरातील प्रमुख शहरांमध्ये घेतली जाईल.
साधारण संवर्गासाठी पेपर 1 चे शुल्क ₹1000, दोन्ही पेपरसाठी ₹1200 तर SC/ST उमेदवारांसाठी अनुक्रमे ₹500 आणि ₹600 शुल्क ठेवले आहे. अर्ज आणि फी भरायला अधिकृत संकेतस्थळ ctet.nic.in वापरावे.
परीक्षेची वेळ —
- पेपर 2: सकाळी 9:30 ते दुपारी 12:00
- पेपर 1: दुपारी 2:30 ते 5:00
इच्छुकांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज पूर्ण करणे आवश्यक आहे.

Comments are closed.