सीटीईटी–मतदान एकाच दिवशी!-CTET Exam Clash with Polls!

CTET Exam Clash with Polls!

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, याच दिवशी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) निश्चित करण्यात आली आहे.

CTET Exam Clash with Polls!त्यामुळे अनेक उमेदवारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही, अशी भीती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर सीटीईटी परीक्षा पुढे ढकलावी, अशी ठाम मागणी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकडून होत आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये निवडणूक कार्यक्रमात बदल झाल्यानंतरही सीटीईटीची तारीख कायम ठेवण्यात आली आहे. परिणामी, परीक्षा आणि मतदान एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. धाराशिव येथील विद्यार्थी स्वप्नील कदम यांनी सांगितले की, “मी सीटीईटीसाठी अर्ज केला आहे; पण माझ्या भागात त्याच दिवशी मतदान असल्याने मला मतदान करता येणार नाही.”

स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे यांनीही सरकारकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. परीक्षा पुढे ढकलल्यास विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी होता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष 2026–27 साठी कला शिक्षण (Fine Arts) CET प्रवेश नोंदणीला 29 जानेवारीपासून सुरुवात झाली असून, ही प्रक्रिया 3 मार्चपर्यंत ऑनलाइन सुरू राहणार आहे. यामध्ये रेखा-रंगकला, शिल्पकला, वस्त्रकला, अंतर्गत गृहसजावट, उपयोजित कला आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

याशिवाय MHT-CET PCM/PCB, MBA/MMS, MCA, LLB, B.Ed, M.Ed, Nursing, Design आणि इतर अनेक अभ्यासक्रमांच्या CET नोंदण्या सुरू आहेत. सर्व अर्ज www.mahacet.org
या अधिकृत संकेतस्थळावरून संगणकाधारित पद्धतीने घेतले जाणार आहेत.

यंदा CET नोंदणीसाठी APAR ID अनिवार्य करण्यात आला असून, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UDID आवश्यक आहे. अद्याप APAR ID नसेल तर तो DigiLocker द्वारे तयार करण्याचे आवाहन CET कक्षाने केले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट द्यावी, असे सांगण्यात आले आहे.

Comments are closed.