NET अर्ज सुरु! चुकवू नका!-CSIR NET Open! Don’t Miss Out!

CSIR NET Open! Don’t Miss Out!

राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) ने CSIR UGC NET डिसेंबर 2025 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ही परीक्षा ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF), सहाय्यक प्राध्यापकपद आणि पीएचडी प्रवेशासाठी घेतली जाते. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर (csirnet.nta.nic.in) जाऊन अर्ज करावा.

CSIR NET Open! Don’t Miss Out!अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 असून, अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख 25 ऑक्टोबर 2025 आहे. अर्जात काही चुका झाल्यास सुधारणा करण्यासाठी विंडो 29 ऑक्टोबरपर्यंत खुली असेल.

पात्रता आणि परीक्षेचे तपशील

उमेदवारांकडे विज्ञान शाखेतील संबंधित विषयात किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Master’s degree) असणे आवश्यक आहे. अंतिम वर्षात शिकणारे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात. JRF साठी वयोमर्यादा 30 वर्षे असून, सहाय्यक प्राध्यापक व पीएचडी प्रवेशासाठी वयोमर्यादा नाही. परीक्षा 18 डिसेंबर 2025 रोजी दोन सत्रांमध्ये (9:30 ते 12:00 व 3:00 ते 6:00) घेतली जाईल. परीक्षेचा कालावधी 3 तास (180 मिनिटे) असणार आहे.

अर्ज कसा कराल?

  1. csirnet.nta.nic.in या वेबसाइटला भेट द्या

  2. “New Registration” वर क्लिक करा आणि सूचना काळजीपूर्वक वाचा

  3. तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, विषय व केंद्र निवडा

  4. फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा

  5. डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे शुल्क भरा

  6. पेमेंट यशस्वी झाल्यावर कन्फर्मेशन पेज डाउनलोड करा व सुरक्षित ठेवा

एक लक्षात ठेवा: एका उमेदवाराने फक्त एकाच विषयासाठी अर्ज करावा. एकाहून अधिक अर्ज केल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.

Comments are closed.