आयसीएसआय (ICSI) संस्थेनं जुलै 2025 मध्ये झालेल्या कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह प्रवेश परीक्षेचा (CSEET) निकाल बुधवारी जाहीर केला. निकालासोबतच विषयवार गुणांची माहिती icsi.edu या अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात आलीये.
परीक्षा ५ आणि ७ जुलै रोजी पार पडली होती. निकाल उमेदवारांना फक्त ऑनलाइन पाहता येणार असून, संस्थेकडून कोणतीही प्रिंट प्रत दिली जाणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलंय.
या परीक्षेत प्रत्येक पेपरमध्ये किमान ४०% गुण, तर एकूण सर्व पेपरमध्ये मिळून ५०% गुण मिळवणं आवश्यक आहे. उत्तीर्ण होण्यासाठी नेगेटिव्ह मार्किंग नाही. दरम्यान, नोव्हेंबर 2025 साठीच्या CSEET परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, नोंदणी 15 ऑक्टोबरपर्यंत करता येईल.
ही परीक्षा 8 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. विद्यार्थ्यांनी icsi.edu किंवा smash.icsi.edu या वेबसाइटवरून आपला निकाल आणि अर्ज नोंदणीची माहिती पाहावी, असं आवाहन संस्थेने केलं आहे.