सरकारी नोकरांना हाय काय! आता बढती हवं का, तर डिजिटल कोर्स पास करावाच लागेल! पंतप्रधान मोदींनी थेट आदेश दिलाय. कर्मयोगी पोर्टलवरचं ऑनलाईन शिक्षण आता वर्षभर करावं लागणार.
कार्मिक खात्यानं स्पष्ट केलं की, हे कोर्स फक्त शिका म्हणून नाही, तर ते नापास झालं, तर APAR मध्ये सुद्धा कमी मार्क मिळतील!
३१ जुलैपर्यंत ओरीएंटेशन वर्कशॉप संपवा, १ ऑगस्टपर्यंत अभ्यासक्रम अपलोड करा, आणि १५ नोव्हेंबरपर्यंत थेट मूल्यांकन! दर मंत्रालयानं सहा अभ्यासक्रम ठरवायचे, आणि ते ९, १६, २५ वर्षांच्या सेवेनुसार विभागले जातील.
किमान ५०% अभ्यासक्रम पूर्ण करणं कंपलसरी आहे. सगळा डेटा ‘SPARROW’ या ऑनलाईन सिस्टिममध्ये जमा होईल. हे म्हणजे मिशन कर्मयोगीचं पुढचं पाऊल – आता कोर्स शिवाय ना मूल्यांकन पूर्ण होणार ना बढती मिळणार!