शहराच्या महापालिकेत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वावर तब्बल ४० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, आता कारभार त्यांच्याच हाती गेल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. महापालिकेच्या एकूण ३०४० मंजूर पदांपैकी ११०० पेक्षा जास्त पदांवर कंत्राटी कर्मचारी कार्यरत असल्याचे उघड झाले आहे.
आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी सांगितले की, शासनाकडे पाठवलेल्या नव्या आकृतीबंद प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास १,२८२ रिक्त पदांची थेट भरती प्रक्रिया सुरू होईल. सध्या मात्र, कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची संख्या फक्त १,९६० इतकी राहिली आहे.
दरम्यान, अनेक कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संबंध स्थानिक राजकीय नेते, अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या नात्याशी असल्याने, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांमध्येही प्रशासनातील या “ठेकेदारी संस्कृती”बद्दल नाराजी वाढली आहे.
स्थानिकांनी शासनाला विनंती केली आहे की, या नेमणुकांची तातडीने चौकशी करून योग्य पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.

Comments are closed.