गडचिरोली पदभरतीत गोंधळ!-Confusion in Gadchiroli Recruitment!

Confusion in Gadchiroli Recruitment!

गडचिरोली जिल्हा परिषदेत ऑगस्ट २०२३ मध्ये पदभरतीची जाहिरात काढण्यात आली होती, त्यानुसार आरोग्य सेवक (महिला) या पदासाठी २८ ऑगस्ट २०२४ रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती.

Confusion in Gadchiroli Recruitment!मात्र, आर्थिक दुर्बल घटक (EWS) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या पदांवर पात्र उमेदवारांची कमी झाल्यामुळे या प्रवर्गातून उमेदवारांची निवड केली गेली नाही.

शासन निर्णयावर संभ्रम:
गेल्या ३१ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार, EWS प्रवर्गातून उमेदवार उपलब्ध न झाल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड केली जावी, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. पण जिल्हा परिषद मधील वरिष्ठ अधिकारी याबाबत संभ्रम दाखवत असून, परिणामी योग्य उमेदवारांना नियुक्ती मिळालेली नाही.

चंद्रपूरचे उदाहरण:
चंद्रपूर जिल्ह्यात EWS प्रवर्गात उमेदवार न मिळाल्याने खुल्या प्रवर्गातून उमेदवारांची निवड केली गेली, मग गडचिरोलीमध्ये वेगळा काय? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ग्रामविकास विभाग कडे मार्गदर्शन मागितलं असता, अधिकारींमध्ये संवादाचा अभाव दिसून आला.

नर्सेस संघटनेचा इशारा:
महाराष्ट्र राज्य नर्सेस व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक जयसिंगपुरे यांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रशासनावर तीव्र टीका केली. ते म्हणाले, “उमेदवारांना नियुक्तीपासून वंचित ठेवणं न्याय्य नाही, आणि जर प्रशासनाने शासन निर्णयानुसार कार्यवाही केली नाही, तर आम्ही हायकोर्ट कडे जाऊ.”

Comments are closed.