घरबसल्या करा ‘ई-केवायसी! – Complete ‘E-KYC’ from Home!

Complete 'E-KYC' from Home!

0

राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधापत्रिकाधारकांना त्यांच्या रेशनकार्डला आधार क्रमांक जोडण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे. पुणे जिल्ह्यातील ६६% शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे.

Complete 'E-KYC' from Home!

आता ‘मेरा ई-केवायसी’ अ‍ॅपच्या मदतीने नागरिक घरी बसून कुटुंबातील सदस्यांचे केवायसी करू शकतात, त्यामुळे स्वस्त धान्य दुकानांमध्ये होणारी गर्दी व वेळेचा अपव्यय टाळता येणार आहे.

पुणे जिल्ह्यात २६.७६ लाख लाभार्थी या योजनेंतर्गत मोफत धान्याचा लाभ घेत आहेत. यापैकी ४८,८७७ शिधापत्रिकाधारक ‘अंत्योदय’ योजनेचे लाभार्थी असून, उर्वरित ५.८६ लाख शिधापत्रिकाधारक प्राधान्य योजनेचे लाभार्थी आहेत. याआधी नागरिकांना आधार कार्ड जोडण्यासाठी थेट स्वस्त धान्य दुकानात जावे लागत होते. मात्र, तांत्रिक अडचणी व लांबच्या रांगा टाळण्यासाठी ‘मेरा ई-केवायसी’ अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.

हे अ‍ॅप Google Play Store वरून डाउनलोड करून नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि OTP वापरून प्रक्रिया पूर्ण करता येईल. यासाठी ‘FaceRD’ अ‍ॅपच्या मदतीने चेहऱ्याचे प्रमाणीकरण केले जाते आणि आधार क्रमांक थेट शिधापत्रिकेशी जोडला जातो. ‘ई-केवायसी’ केल्याने कोणताही अनधिकृत व्यक्ती तुमच्या नावाने धान्य उचलू शकणार नाही, त्यामुळे फसवणूक रोखली जाणार आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार, लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.