अनुकंपा तत्त्वावरील १० हजार जागा अखेर भरल्या जाणार! | Compassionate 10K Posts to Be Filled – Big Decision!

Compassionate 10K Posts to Be Filled – Big Decision!

राज्यातील चतुर्थ श्रेणीतील अनुकंपा तत्त्वावरील १० हजार जागा अनेक वर्षांपासून रिक्त होत्या. राज्य सरकारने अखेर या जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Compassionate 10K Posts to Be Filled – Big Decision!

अनुकंपा तत्त्व म्हणजे काय?
एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास कुटुंबातील वारसाला त्या विभागात नोकरी देण्याची तरतूद अनुकंपा तत्त्वावर आहे. हे धोरण १९७३ पासून लागू आहे, पण गेल्या अनेक वर्षांपासून या भरती प्रक्रिया अडथळ्यांमध्ये अडकलेली होती.

कर्मचारी संघटनांचा पाठपुरावा यशस्वी
सरकारी कर्मचारी संघटनांनी या भरतीसाठी राज्य सरकारकडे सतत मागणी केली होती. अलीकडेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणीपत्र सादर केले. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे.

रिक्त जागा व भरतीची सुरुवात
राज्यातील चतुर्थ श्रेणीतील सुमारे ९ हजार ६५८ जागा रिक्त आहेत. या सर्व जागा पुढील काही दिवसांत भरल्या जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ सप्टेंबरपासून भरतीला सुरुवात होईल.

सात हजार लिपिकांची भरती
लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सात हजार लिपिकांचीही भरती करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया १५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. यात पंचायत राज, जिल्हा परिषदा, महानगर पालिका, ग्रामीण व शहरी विकास संस्था यांचा समावेश आहे.

महापालिका आणि जिल्हा परिषद यांतील जागा
अनुकंपा तत्त्वावरील सुमारे ५ हजार २२८ पदे महापालिकांमध्ये आहेत. जिल्हा परिषदांमध्ये ३ हजार ७०५ जागा, नगरपालिकांमध्ये ७२५ पदे भरली जाणार आहेत.

जिल्हानिहाय जागा – नांदेड, पुणे, गडचिरोली, नागपूर
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५०६ उमेदवार जागा भरणार आहेत. पुण्यात ३४८, गडचिरोलीत ३२२ आणि नागपूरमध्ये ३२० पदे भरण्यात येणार आहेत.

Comments are closed.