बारावी अर्ज मुदतवाढ!-Class 12 Exam Deadline Extended!

Class 12 Exam Deadline Extended!

महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूराचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, अनेक विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षा अर्ज भरण्यात अडचणी येत आहेत.

Class 12 Exam Deadline Extended!या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ देत २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत अर्ज भरता येतील, असा निर्णय घेतला आहे.

मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगरसह इतर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे अर्ज भरणे कठीण झाले होते. विद्यार्थ्यांनी नियमित शुल्कासह अर्ज भरण्यास मागणी केली होती.

शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंडळाच्या अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ सुनिश्चित केली आहे. त्यानुसार, १७ क्रमांकाचा अर्ज भरून विद्यार्थी परीक्षा प्रविष्ट होऊ शकतील. १५ ऑक्टोबरपर्यंत नोंदणी आणि ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध राहील.

यामुळे परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Comments are closed.