तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा झाले आहेत हे जाणून घेणे प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाचं आहे. पगारातून दरमहा PF कपात होते आणि कंपनीकडूनही तितकाच वाटा जमा केला जातो. सरकार या रकमेवर व्याजही देते.
पण तुमच्या खात्यात प्रत्यक्षात किती रक्कम जमा झाली आहे, कंपनीने वेळेवर पैसे भरले आहेत का, हे नियमित तपासणे गरजेचे असते. यासाठी EPFO ने ऑनलाइन सोय उपलब्ध करून दिली आहे.
PF बॅलन्स तपासणे आता अगदी काही मिनिटांत शक्य आहे. मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून तुम्ही सहज तुमचे पासबुक पाहू शकता. सर्वात आधी EPFO पासबुकची अधिकृत वेबसाइट उघडा—https://passbook.epfindia.gov.in/MemberPassBook/login
. साइट उघडल्यानंतर लॉगिनसाठी तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकावा लागतो.
लॉगिन केल्यानंतर तुमच्या खात्याचे डॅशबोर्ड दिसेल. येथे दिलेल्या पर्यायांमधून Passbook या सेक्शनवर क्लिक करावे. तुमच्या सध्याच्या कंपनीचे पासबुक निवडताच तुमच्या PF खात्यातील संपूर्ण व्यवहार स्क्रीनवर दिसतील.
येथे तुम्ही एकूण जमा रक्कम, कंपनीकडून जमा होणारा भाग, तुमचा हिस्सा, पेन्शनची नोंद आणि दरमहा भरलेली रक्कम यांचे तपशील पाहू शकता. कंपनीने PF वेळेवर भरले आहे का, हेही स्पष्टपणे दिसते. एकूणच, काही मिनिटांत तुमचे PF खात्याचे संपूर्ण अपडेट तुम्ही सहज मिळवू शकता.

Comments are closed.