राज्याच्या सीईटी सेलने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलंय. यानुसार २४ मार्चपासून सीईटी परीक्षांना सुरुवात होणार असून, त्या दिवशी एमपीएडची सीईटी होईल.
इंजिनीअरिंगसाठी आवश्यक असलेली पीसीएम गटाची पहिली सीईटी ११ ते १९ एप्रिल, तर पीसीबी गटाची सीईटी २१ ते २६ एप्रिल या काळात घेण्याचं ठरवलं आहे. दुसऱ्या फेरीसाठी पीसीएमची १४ ते १७ मे, तर पीसीबीची १०-११ मे ही संभाव्य वेळ ठेवली आहे.
‘नीट’ आणि ‘जेईई’ प्रमाणेच राज्यातील विद्यार्थ्यांनाही दोन वेळा सीईटीची संधी मिळावी म्हणून हा बदल करण्यात आलाय. सीईटी सेलने राष्ट्रीय परीक्षांचा विचार करून हे वेळापत्रक ठरवलं असून, त्यात काही बदल होण्याची शक्यता ठेवली आहे.
विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने हे वेळापत्रक नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यातच जाहीर करण्यात आलं.

Comments are closed.