राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध पदवी व पदव्युत्तर प्रवेश परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा ओढा सातत्याने वाढताना दिसत आहे. गेल्या पाच वर्षांत सीईटी परीक्षांच्या नोंदणीत तब्बल ५.५१ लाखांची वाढ नोंदवली गेली आहे.
सन २०२१–२२ मध्ये सुमारे ८.५६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर २०२५–२६ मध्ये ही संख्या वाढून १४.०८ लाखांवर पोहोचली. वर्षागणिक नोंदणी वाढत असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
विशेषतः इंजिनीअरिंग, फार्मसी व कृषी अभ्यासक्रमांसाठीच्या MHT-CET परीक्षेला मोठी पसंती मिळत असून, या परीक्षांच्या नोंदणीत पाच वर्षांत सुमारे अडीच लाखांची वाढ झाली आहे.
नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी प्रत्यक्ष परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात राहिले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांची वाढती मागणी आणि अकरावीतील विद्यार्थीसंख्येत होणारी वाढ ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.