सीईटी नोंदणीचा ६ लाखांचा टप्पा!-CET Registrations Cross 6 Lakh!

CET Registrations Cross 6 Lakh!

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) घेण्यात येणाऱ्या सीईटी २०२६ परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून, नोंदणीने सहा लाखांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत तब्बल ६ लाख ४ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमांसाठी नोंदणी केली आहे.

CET Registrations Cross 6 Lakh!एमपीएड व एमएड अभ्यासक्रमांपासून सीईटी प्रक्रियेला सुरुवात झाली असून, सध्या १७ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांची नोंदणी सुरू आहे. यंदा प्रथमच पीसीएम, पीसीबी आणि एमबीए/एमएमएस या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना दोन संधी देण्यात आल्याने नोंदणीचा आकडा ८.४५ लाखांवर पोहोचला आहे.

यामध्ये पीसीएम सीईटीसाठी सर्वाधिक अर्ज झाले असून, त्यापाठोपाठ पीसीबी, बीएड आणि एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांचा क्रम लागतो. यंदा एकूण १७ सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने मार्च अखेर ते मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यभर घेतल्या जाणार आहेत.

विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेपूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले असून, सविस्तर माहिती www.mahacet.org
या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Comments are closed.