सीईटी नोंदणी मुदत १८ मार्चपर्यंत!-CET Registration Till Mar 18!

CET Registration Till Mar 18!

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध पदवी आणि एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा (CET) नोंदणीस विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने नोंदणीची अंतिम तारीख ४ मार्चवरून आता १८ मार्चपर्यंत वाढवली आहे.

CET Registration Till Mar 18!या प्रवेश प्रक्रियेत बीएचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीबीएम, बीएमएस तसेच एमबीए (इंटिग्रेटेड) आणि एमसीए (इंटिग्रेटेड) अशा सात अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांकडून या अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ५६,७२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे.

संबंधित सीईटी परीक्षा २८ ते ३० एप्रिल दरम्यान राज्यातील विविध केंद्रांवर ऑनलाइन (संगणकाधारित) पद्धतीने होणार आहे. व्यवस्थापन आणि संगणक क्षेत्रात वाढत्या करिअर संधीमुळे या अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक वाढत असल्याचे दिसून येत आहे.

यंदापासून नोंदणी प्रक्रियेत APAR ID (ऑटोमेटेड पर्मनंट अकॅडेमिक अकाउंट रजिस्ट्री) समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UDID (युनिक डिसॅबिलिटी आयडी) नमूद करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र हे आयडी बंधनकारक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी नियमितपणे अद्ययावत सूचना तपासाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.