सीईटी नोंदणीला मुदतवाढ!-CET Registration Extended!

CET Registration Extended!

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी घेतल्या जाणाऱ्या एमसीए आणि एमएचएमसीटी या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी प्रवेश नोंदणीस १८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.

CET Registration Extended!यापूर्वी एमएचएमसीटी अभ्यासक्रमासाठी नोंदणीची मुदत ७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६, तर एमसीए अभ्यासक्रमासाठी ७ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आली होती. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडून आलेल्या विनंतीनंतर दोन्ही अभ्यासक्रमांसाठी एकत्रित मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.

सध्या एमसीए अभ्यासक्रमासाठी ३१,९६१ विद्यार्थ्यांनी, तर एमएचएमसीटी अभ्यासक्रमासाठी ४० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मागील वर्षी एमसीए सीईटीसाठी ५६ हजारांहून अधिक, तर एमएचएमसीटीसाठी ८० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

एमएचएमसीटी सीईटी परीक्षा २५ मार्च २०२६ रोजी, तर एमसीए सीईटी परीक्षा ३० मार्च २०२६ रोजी होणार आहे. या दोन्ही परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर ऑनलाइन (संगणकाधारित) पद्धतीने घेण्यात येणार असून, अर्ज प्रक्रिया, वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Comments are closed.