CET नोंदणीला दिलासा!-CET Registration Extended!

CET Registration Extended!

शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी एमपीएड (Master of Physical Education) आणि एमएड (Master of Education) या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

CET Registration Extended!राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) या दोन्ही अभ्यासक्रमांच्या CET नोंदणीस १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या उमेदवारांना पुन्हा एक संधी उपलब्ध झाली आहे.

यापूर्वी ही नोंदणी प्रक्रिया ५ जानेवारी ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत सुरू होती. CET कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एमपीएड CET साठी १,०३८ तर एमएड CET साठी १,२३४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे ही मुदतवाढ देण्यात आल्याचे मानले जात आहे.

परीक्षांच्या वेळापत्रकानुसार, एमपीएडची लेखी प्रवेश परीक्षा २४ मार्च २०२६ रोजी होणार असून, त्यानंतर २५ मार्च २०२६ रोजी फिल्ड टेस्ट (मैदानी चाचणी) घेतली जाणार आहे. एमएड अभ्यासक्रमाची CET प्रवेश परीक्षा देखील २५ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सर्व परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार असून, उमेदवारांनी वेळेत अर्ज करून परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन CET कक्षाकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.