आजपासून CET रणसंग्राम सुरू!-CET Exams Kick Off Today!

CET Exams Kick Off Today!

राज्यातील विविध व्यावसायिक, तांत्रिक, आरोग्य आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी लागणारी सीईटी परीक्षा आजपासून सुरू झाली आहे. ही परीक्षा २४ मार्च ते १६ मेपर्यंत चालणार असून, तब्बल १७ लाखांहून अधिक विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.

CET Exams Kick Off Today!यंदा एमपीएड परीक्षेपासून सुरुवात होत असून, एकूण १७ पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बीबीए, बीसीए आणि बीएमएससाठी अर्ज प्रक्रिया अजूनही सुरू असल्याने विद्यार्थ्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावेळी सुमारे १७.६३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

विशेष म्हणजे, पीसीबी आणि एमबीए/एमएमएससारख्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच दोन संधी देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे स्पर्धा वाढणार असली तरी विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळणार आहे.

Comments are closed.