सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर!-CET Exam Schedule Released!

CET Exam Schedule Released!

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२६–२७ साठी विविध उच्च शिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये एलएलबी (३ व ५ वर्ष), बीएड, बीपीएड, एमएड, एमपीएड आणि बीएड-एमएड या सात अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा निश्चित करण्यात आल्या आहेत.

CET Exam Schedule Released!सीईटी सेलच्या माहितीनुसार, एमपीएडची परीक्षा २४ मार्च रोजी होणार असून त्याची फील्ड टेस्ट २५ मार्च रोजी ऑफलाइन पद्धतीने होईल. एमएडची परीक्षा २५ मार्च, तर बीएड (जनरल व स्पेशल) आणि बीएड (ELCT) या परीक्षा २७ ते २९ मार्च दरम्यान घेतल्या जाणार आहेत. एलएलबी (३ वर्ष) प्रवेश परीक्षा १ आणि २ एप्रिल, तर बीपीएडची परीक्षा ४ एप्रिल रोजी होईल आणि त्याची फील्ड टेस्ट ५ ते ७ एप्रिल दरम्यान घेतली जाईल. बीएड-एमएड (एकात्मिक) परीक्षा ९ एप्रिल, तर एलएलबी (५ वर्ष) प्रवेश परीक्षा ८ मे रोजी होणार आहे.

या परीक्षांसाठी प्रवेशपत्रे परीक्षेच्या काही दिवस आधी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेबाबतची अद्ययावत माहिती आणि सूचनांसाठी अधिकृत संकेतस्थळ www.mahacet.org ला नियमित भेट देण्याचे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.

यंदा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची सीईटी २४ मार्चपासून सुरू होऊन १७ मेपर्यंत म्हणजे सुमारे ४५ दिवसांत १७ अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. आतापर्यंत १२.९४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून दोन्ही संधी मिळून सुमारे १७.४२ लाख विद्यार्थी या प्रवेश परीक्षा देणार आहेत.

Comments are closed.