CET सेलमध्ये संधी २०२६!-CET Cell Recruitment 2026 Open!

CET Cell Recruitment 2026 Open!

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET Cell) अंतर्गत २०२६ साठी जिल्हा संपर्क अधिकारी पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या विद्यार्थी सहाय्यता केंद्रांचे कामकाज प्रभावीपणे चालवण्यासाठी ही भरती केली जात आहे.

CET Cell Recruitment 2026 Open!या पदांसाठी सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून कंत्राटी पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी एकूण ४० पदे उपलब्ध आहेत.

इच्छुक व पात्र उमेदवारांनी १० जानेवारी २०२६ पर्यंत www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्जासोबत आवश्यक माहिती स्वतः साक्षांकित करून सादर करावी लागणार असून, ही भरती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments are closed.