महाराष्ट्र सीईटी 2026: संभाव्य वेळापत्रक जाहीर – २४ मार्चपासून परीक्षा! | CET 2026 Schedule Out, Exams Begin!

CET 2026 Schedule Out, Exams Begin!

महाराष्ट्राच्या सीईटी कक्षाकडून शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीच्या विविध प्रवेश परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार सीईटी परीक्षा २४ मार्च 2026 पासून सुरू होणार आहेत. पीसीएम, पीसीबी आणि एमबीए–एमएमएस या तीन प्रमुख परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना दोन वेळा बसण्याची संधी मिळणार आहे.

CET 2026 Schedule Out, Exams Begin!

राष्ट्रीय स्तरावरील जेईई आणि नीट परीक्षांच्या तारखा लक्षात घेऊन हे वेळापत्रक आखण्यात आले असून विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा हा उद्देश आहे. हे वेळापत्रक सध्या संभाव्य असून त्यात पुढे बदल होऊ शकतात.

सीईटी 2026: संभाव्य वेळापत्रक
सीईटी 2026 चे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असून परीक्षा 27 मार्चपासून सुरू होतील. मार्च महिन्यात B.Ed ची परीक्षा 27 ते 29 मार्चदरम्यान तर MCA ची CET 30 मार्च रोजी होईल. एप्रिलमध्ये 1 व 2 एप्रिल रोजी LLB (3 Years), 5 एप्रिलला B.Design, तर 6 ते 8 एप्रिलदरम्यान MBA–MMS ची पहिली CET होणार आहे. इंजिनिअरिंग प्रवेशासाठी आवश्यक असलेली PCM ची पहिली CET 11 ते 19 एप्रिल आणि फार्मसीसाठी PCB ची पहिली CET 21 ते 26 एप्रिलदरम्यान घेण्यात येईल. BBA, BCA, BMS, BBM अभ्यासक्रमांसाठीची CET 28 ते 30 एप्रिलदरम्यान असेल. मे महिन्यात Nursing ची CET 6 व 7 मे रोजी, LLB (5 Years) ची CET 8 मे रोजी, MBA–MMS ची दुसरी CET 9 मे रोजी, PCB ची दुसरी CET 10 व 11 मे रोजी आणि PCM ची दुसरी CET 14 ते 17 मेदरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

महत्त्वाची माहिती

  • पुढील वर्षी एमबीए–एमएमएस, पीसीएम आणि पीसीबी या तीन विषयांसाठी दोन वेळा सीईटी होणार आहेत.
  • विद्यार्थ्यांना अधिक प्रयत्नांची संधी उपलब्ध होईल.
  • 2025-26 मध्ये 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी नोंदणी केली होती.
  • हे वेळापत्रक नोव्हेंबरमध्येच जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना पुरेसा अभ्यासकाल मिळेल.

Comments are closed.