आजपासून महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलच्या वेबसाइटवर LLB 3 वर्षांच्या प्रवेश परीक्षेचे हॉलतिकीट डाउनलोड करण्याची सुविधा विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाईट https://cetcell.mahacet.org/ वर जाऊन आपले हॉलतिकीट डाउनलोड करता येईल.
अधिकृत माहितीनुसार, एलएलबी 3 वर्षांच्या परीक्षेसाठी विविध परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या परीक्षा २ मे आणि ३ मे २०२५ रोजी पार पडणार आहेत. पूर्वी ३ मे आणि ४ मे २०२५ रोजी परीक्षा होणार होत्या, परंतु ४ मे रोजी नीट परीक्षा असल्यामुळे परीक्षा एका दिवशी पुढे केली गेली आहे.
हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी:
१. सर्वप्रथम https://cetcell.mahacet.org/ वेबसाईटवर जा.
२. होमपेजवर CET लॉगिन लिंकवर क्लिक करा.
३. नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करा.
४. हॉलतिकीट डाउनलोड करा आणि प्रिंट करा.
सीईटी सेलने सर्व विद्यार्थ्यांना वेळेवर परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.