केंद्रप्रमुख मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी २१ मार्चपर्यंत त्यांची टेट किंवा सीटेट संबंधित माहिती सादर करणे अनिवार्य आहे, असे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
तसेच उमेदवारांना त्यांच्या गुणांची पडताळणी करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांना निकालाबाबत शंका असल्यास दुरुस्तीची संधी मिळणार आहे.
ही परीक्षा ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने तीन सत्रांमध्ये पार पडली होती. राज्यातील १२ जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांना केंद्रप्रमुख पदासाठी पदोन्नती देण्यासाठी ही मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती.
या प्रक्रियेमुळे पात्र शिक्षकांना पुढील पदोन्नतीचा मार्ग मोकळा होणार असून, शिक्षण व्यवस्थेत नेतृत्वाची नवी संधी उपलब्ध होणार आहे.

Comments are closed.