सेंट्रल बँकेत भरती ! – Central Bank Hiring !

Central Bank Hiring !

0

सेंट्रल बँकेत नोकरी मिळवायची इच्छा असेल, तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे! Central Bank of India मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. बीसी सुपरवायझर, वॉर्डन, काउंसलर, ऑफिस असिस्टंट, फॅकल्टी, वॉचमन, अटेंडंट अशा अनेक पदांवर सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे.

Central Bank Hiring !

या भरतीची संपूर्ण माहिती बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर (www.centralbankofindia.co.in) उपलब्ध आहे. अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करायचे असून, पदानुसार अर्ज करण्याच्या अंतिम तारखा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे पात्रतेनुसार लवकर अर्ज करणे महत्त्वाचे आहे.

महत्वाच्या तारखा (पदानुसार)

  • ऑफिस असिस्टंट, फॅकल्टी, वॉचमन, अटेंडंट – अर्जाची शेवटची तारीख: १० एप्रिल २०२५
  • बीसी सुपरवायझर (जालंधर), कार्यालय सहाय्यक, चौकीदार (RSETI जबलपूर, मंडला) – १५ एप्रिल २०२५
  • FLC काउंसलर पदासाठी – अर्ज करण्याची अंतिम तारीख: २४ एप्रिल २०२५
  • फॅकल्टी व ऑफिस असिस्टंट (शहडोल, डिंडोरी, अन्नपूर) – १५ एप्रिल २०२५
  • वॉर्डन पदासाठी – शेवटची तारीख: २१ एप्रिल २०२५

शैक्षणिक पात्रता काय आहे?
प्रत्येक पदासाठी पात्रता वेगळी आहे. काही ठिकाणी पदवी लागते, तर काही पदांकरिता १०वी/१२वी उत्तीर्ण असले तरी चालते. त्यामुळे अर्ज करण्याआधी जाहिरात व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे.

अर्ज कसा करायचा?

  • www.centralbankofindia.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • Recruitment विभागात जा
  • तुम्हाला हवं असलेलं पद निवडा
  • अर्ज फॉर्म भरून, आवश्यक ती माहिती द्या
  • काही पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे – यासाठी दिलेल्या पत्त्यावर फॉर्म पोस्ट करावा
  • अधिक माहितीसाठी वेबसाइटला वेळोवेळी भेट देत रहा

Leave A Reply

Your email address will not be published.