CBSE परीक्षेचा ताण दूर!- CBSE Mental Health Support Drive!

CBSE Mental Health Support Drive!

परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारा ताण, भीती आणि मानसिक अस्वस्थता कमी करण्यासाठी सीबीएसईने निःशुल्क मानस-सामाजिक समुपदेशन उपक्रम सुरू केला आहे. या सेवांचा पहिला टप्पा ६ जानेवारीपासून १ जूनपर्यंत उपलब्ध राहणार आहे.

CBSE Mental Health Support Drive!या उपक्रमाअंतर्गत दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी २४ तास सुरू असलेली टोल-फ्री हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे. हिंदी व इंग्रजी या दोन भाषांतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार असून, तणावमुक्त अभ्यास, परीक्षेपूर्वीची भीती कमी करणे, वेळेचे नियोजन आणि ताण व्यवस्थापन याबाबत उपयुक्त सल्ला दिला जाणार आहे.

याशिवाय, आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी सकाळी ९.३० ते ५.३० या वेळेत थेट दूरध्वनी समुपदेशनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. डिजिटल माध्यमांचा विचार करून, विद्यार्थ्यांसाठी भावनिक आरोग्य, अभ्यास कौशल्ये आणि तणाव नियंत्रणावर आधारित ऑनलाइन साहित्य सीबीएसईच्या अधिकृत संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात आले आहे.

देशभरातील सीबीएसई संलग्न शाळांचे मुख्याध्यापक, समुपदेशक, विशेष शिक्षक आणि पात्र मानसशास्त्रज्ञ या उपक्रमात सहभागी झाले असून, काही तज्ज्ञ परदेशातूनही विद्यार्थ्यांना मदत करणार आहेत. विशेष म्हणजे, ही संपूर्ण सेवा स्वयंसेवी आणि पूर्णपणे मोफत असल्याचे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.