सीबीएसई मंडळानं आता विद्यार्थ्यांमधल्या बोलक्या आणि आत्मविश्वासू मुलांना पुढं आणायचं ठरवलंय. त्यासाठी त्यांनी एक भन्नाट उपक्रम सुरू केलाय – CBSE Student Podcast Anchor Program!
म्हणजे काय? आता विद्यार्थीच CBSE च्या सोशल मीडियावर पॉडकास्ट करणार!
या उपक्रमाचा उद्देश काय तर, विद्यार्थ्यांचं संवाद कौशल्य वाढवणं, त्यांच्या कल्पना लोकांसमोर आणणं आणि शिक्षण थोडं संवादात्मक बनवणं.
शाळांना करायचं काय?
ज्या शाळांना त्यांचे विद्यार्थी या उपक्रमासाठी पाठवायचे आहेत, त्यांनी अर्ज भरायचा.
त्यात विद्यार्थ्याची माहिती, त्याचं या उपक्रमात भाग घेण्याचं कारण, आणि पालकांची परवानगी असणं गरजेचं आहे.
निवड झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन ट्रेनिंग दिलं जाईल.
निवडलेले विद्यार्थी CBSE च्या अधिकृत सोशल मीडिया चॅनलवर पॉडकास्ट करतील.
CBSE काय म्हणतं?
“विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व आणि संवाद कौशल्य घडवण्यासाठीच हा उपक्रम आहे. ही एक संधी आहे त्यांचं म्हणणं संपूर्ण देशभर पोहोचवण्याची!” असं सचिव हिमांशू गुप्ता यांनी सांगितलं.

Comments are closed.