CBSE बोर्ड विद्यार्थ्यांसाठी मोठा अपडेट; दहावी–बारावीच्या परीक्षेच्या तारखांत बदल, सुधारित वेळापत्रक जाहीर! | CBSE Board Changes Class 10, 12 Exam Dates!

CBSE Board Changes Class 10, 12 Exam Dates!

दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल जाहीर केला आहे. 3 मार्च 2026 रोजी नियोजित असलेली परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, हा बदल फक्त 3 मार्चच्या परीक्षेसाठीच लागू आहे. उर्वरित सर्व परीक्षा मूळ वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार असल्याचे बोर्डाने अधिकृत नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.

CBSE Board Changes Class 10, 12 Exam Dates!

सुधारित वेळापत्रकानुसार, इयत्ता 10वीची 3 मार्चची परीक्षा आता 11 मार्च 2026 रोजी घेतली जाईल. तर 12वीच्या विद्यार्थ्यांची 3 मार्चची परीक्षा 10 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या बदलामुळे विशेषतः बारावीच्या विद्यार्थ्यांना तयारीसाठी अतिरिक्त वेळ मिळणार असून, विद्यार्थ्यांनी या बदलाची नोंद घेऊन अभ्यासाचे नियोजन तात्काळ सुधारावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, शाळांना हा बदल विद्यार्थी व पालकांपर्यंत तातडीने पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुधारित तारखा ‘प्रवेशपत्रावर’ (Admit Card) देखील नमूद केल्या जातील. विद्यार्थ्यांनी कोणताही गोंधळ न करता इतर विषयांचा अभ्यास मूळ वेळापत्रकानुसार सुरू ठेवावा आणि अधिकृत अपडेट्ससाठी शाळेच्या संपर्कात राहावे, असे CBSE बोर्डाने स्पष्ट केले आहे.

Comments are closed.