इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) तर्फे जानेवारी 2026 मध्ये घेतलेल्या CA Intermediate आणि CA Foundation परीक्षांचे निकाल जाहीर झाले.
CA Intermediate मध्ये हरियाणातील कन्हैया लाल याने देशात पहिला क्रमांक मिळवला, तर CA Foundation मध्ये मदुराई येथील लोगप्रिया पी. पी. हिने अव्वल स्थान पटकावले.
देशभरातील शेकडो केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. इंटरमीजिएट परीक्षेत एकूण उत्तीर्णतेचे प्रमाण सुमारे 9.39% राहिले, तर CA Foundation परीक्षेचा निकाल 19.23% लागला.
फाउंडेशन परीक्षेत लोगप्रिया पी. पी. हिने 400 पैकी 366 गुण (91.50%) मिळवत देशात प्रथम क्रमांक मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर खुशी सिकारिया, तर तिसऱ्या क्रमांकावर हिबा पी., सुमन कार्की आणि राघव नरेश गुप्ता यांनी संयुक्तपणे स्थान मिळवले.

Comments are closed.