BSF Recruitment 2025: सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल पदांची भरती! | BSF Head Constable Jobs!

BSF Head Constable Jobs!

सीमा सुरक्षा दलात नोकरी करण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. BSF ने Head Constable (Radio Operator – RO आणि Radio Mechanic – RM) या पदांसाठी 1012 पदांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 23 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

BSF Head Constable Jobs!

अर्ज प्रक्रिया व महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख 24 ऑगस्ट 2025 असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2025 आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवारांनी अधिकृत BSF वेबसाइट https://www.rectt.bsf.gov.in
वर जाऊन “चालू भरती संधी” विभागात अर्ज सादर करावा. अर्ज सादर केल्यानंतर प्रिंट काढून ठेवा.

शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित विषयांसह बारावी परीक्षा किमान 60% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर, मॅट्रिकनंतर ITI (२ वर्षांचा कोर्स संबंधित ट्रेडमध्ये) असणेही बंधनकारक आहे.

वयोमर्यादा
सामान्य (UR) उमेदवारांची कमाल वयमर्यादा २५ वर्षे, OBC उमेदवारांसाठी २८ वर्षे, तर SC/ST उमेदवारांसाठी ३० वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू होईल.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड तीन टप्प्यांत केली जाईल:

  • PST व PET (शारीरिक चाचण्या)
  • CBT (संगणक आधारित परीक्षा)
    कागदपत्र पडताळणी, RO पदासाठी डिक्टेशन व परिच्छेद वाचन चाचणी, तसेच वैद्यकीय तपासणी (DMR/RME)

परदेशातील नोकरी संधी: 5000 पदे
१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इस्राईलमध्ये Home Based Health Care Giver Workers या पदासाठी 5000 जागांची संधी उपलब्ध आहे. स्थिर नोकरी, चांगले वेतन आणि परदेशात काम करण्याची सुवर्णसंधी असल्यामुळे युवकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

पात्रता निकष परदेशातील नोकरीसाठी
उमेदवार किमान १० वी उत्तीर्ण, इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असलेले, वय २५–४५ वर्षे असलेले असावे. तसेच भारतातील मान्यताप्राप्त प्रशिक्षित प्रमाणपत्र (किमान ९९० तासांचा कोर्स) असणे आवश्यक आहे. मिडवायफरी, नर्सिंग, फिजिओथेरपी किंवा संबंधित प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज व संपर्क
उमेदवारांनी अधिक माहिती व अर्जासाठी https://maharashtrainternational.com संकेतस्थळाला भेट द्यावी. जळगाव जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्र. ०२५७-२९५९७९० किंवा शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस. ग्राऊंडजवळ, जळगाव येथे संपर्क साधावा.

Comments are closed.