नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत तब्बल 2,331 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. या भरतीद्वारे लिपिक, शिपाई, चालक व स्टेनोग्राफर अशा विविध पदांवर नियुक्ती केली जाणार आहे.
या भरतीची अधिकृत जाहिरात मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून, प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व अटी स्पष्ट करण्यात आल्या आहेत. उमेदवारांना 15 डिसेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
अर्ज करण्याची अंतिम मुदत 5 जानेवारी 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. सर्व अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून अर्ज शुल्क म्हणून 1,000 रुपये आकारले जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी https://bombayhighcourt.nic.in
या अधिकृत संकेतस्थळावरुनच अर्ज करावा.
या भरतीमुळे उच्च न्यायालयांतर्गत विविध कार्यालयांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर नियुक्ती होणार असून, अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना शासकीय नोकरीची संधी मिळणार आहे.

Comments are closed.