बँक ऑफ इंडिया (BOI) कडून क्रेडिट ऑफिसर भरती 2025 अंतर्गत एकूण 514 पदांसाठी सुरू असलेली ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आज, 5 जानेवारी 2026 रोजी संपणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विलंब न करता bankofindia.bank.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भरती मोहिमेद्वारे बँक ऑफ इंडियामध्ये SMGS-IV (36 पदे), MMGS-III (60 पदे) आणि MMGS-II (418 पदे) अशी एकूण 514 पदे भरली जाणार आहेत. क्रेडिट ऑफिसर पदासाठी करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी मानली जात आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन Careers विभागात प्रवेश करावा. त्यानंतर Credit Officer Recruitment लिंकवर क्लिक करून Apply Online पर्याय निवडावा. नोंदणी पूर्ण केल्यानंतर अर्ज भरणे, अर्ज शुल्क भरणे व सबमिट केल्यानंतर कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून त्याची प्रिंट सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्काबाबत बोलायचे झाल्यास, SC/ST/PWD उमेदवारांसाठी ₹850 तर सामान्य व इतर प्रवर्गासाठी ₹1750 इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे. अर्ज शुल्काचे पेमेंट डेबिट/क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, UPI, QR कोड, मोबाईल वॉलेट्स यांच्या माध्यमातून करता येणार आहे. ऑनलाइन व्यवहार शुल्क उमेदवारालाच भरावे लागणार आहे.
निवड प्रक्रिया ऑनलाइन परीक्षा व/किंवा वैयक्तिक मुलाखत यांच्या आधारे करण्यात येणार आहे. ऑनलाइन परीक्षेत 150 प्रश्न (150 गुण) असतील आणि परीक्षेचा कालावधी 120 मिनिटे असेल. इंग्रजी भाषेचा पेपर फक्त पात्रता स्वरूपाचा असून त्याचे गुण अंतिम गुणवत्ता यादीत धरले जाणार नाहीत. उर्वरित सर्व चाचण्या इंग्रजी व हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असतील.
भरती प्रक्रियेबाबत अधिक तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

Comments are closed.