राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. BOB कॅपिटल मार्केट्स लिमिटेड (BOB Capital Markets Ltd.) ने भरती प्रक्रिया सुरू केली असून, या भरतीद्वारे थेट बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर पदासाठी निवड होणार आहे.
या भरतीसाठी कोणतीही मोठी शैक्षणिक अट नाही. केवळ 12वी पास उमेदवारही या पदासाठी अर्ज करू शकतात, मात्र संबंधित क्षेत्रात ६ महिन्यांचा अनुभव असणे गरजेचे आहे. त्यामुळे अगदी कमी पात्रता असूनही चांगल्या पगाराची संधी BOB ने उपलब्ध करून दिली आहे.
या भरतीत एकूण ७० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात असून, इच्छुक उमेदवारांना आपले अर्ज ई-मेल द्वारे पाठवावे लागतील. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२५ आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज पाठवून संधीचा लाभ घ्यावा.
या पदासाठी पगाराची रक्कमही लक्षवेधी आहे. ₹५०,००० ते ₹५५,००० पर्यंत पगार देण्यात येईल, असा अंदाज आहे. कोणतीही लेखी परीक्षा किंवा फी आकारली जात नाही, ही सुद्धा उमेदवारांसाठी एक दिलासा देणारी बाब आहे.
वयोमर्यादा विषयी भरती जाहिरातीत स्पष्ट उल्लेख नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ किंवा ई-मेलद्वारे थेट माहिती घ्यावी.
नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर असू शकते. त्यामुळे ही संधी फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता, देशभरातील उमेदवारांसाठी आहे. खास करून अशा उमेदवारांसाठी ही संधी खूप महत्त्वाची आहे ज्यांना फायनान्स, बँकिंग किंवा सेल्स क्षेत्रात करिअर घडवायचं आहे.
- अर्ज कसा कराल?
- उमेदवारांनी आपला बायोडाटा/रेझ्युमे व आवश्यक कागदपत्रे एकत्र करून [email protected] या ईमेल पत्त्यावर पाठवायची आहेत.
- अधिक माहितीसाठी BOB च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: www.bobcaps.in
ही भरती केवळ नोकरी मिळवण्याची संधी नाही, तर एक चांगले करिअर घडवण्याची पहिली पायरी आहे. त्यामुळे वेळ न दवडता अर्ज करा आणि सरकारी बँकेच्या एका शाखेत अधिकारी होण्याचा मान मिळवा!
तुमच्या शेजारी, मित्रपरिवारातही 12वी पास उमेदवार असतील, तर त्यांनाही ही माहिती शेअर करा – कारण संधी ही केवळ तयारीवाल्यालाच मिळते!