बँकिंग क्षेत्रात सुवर्णसंधी! बँक ऑफ बडोदा मध्ये ४१९ पदांसाठी भरती जाहीर! | Bank of Baroda Announces 419 Vacancies!

Bank of Baroda Announces 419 Vacancies!

बँकेत करिअर घडवू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदाने ४१९ विविध पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीत डेप्युटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, सिनियर मॅनेजर तसेच एमएसएमई आणि क्रेडिट अॅनालिस्टसारख्या विशेष पदांचा समावेश आहे. इच्छुक उमेदवारांनी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Bank of Baroda Announces 419 Vacancies!

या भरती मोहिमेत असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (एमएसएमई), डेप्युटी मॅनेजर (एमएसएमई), असिस्टंट मॅनेजर (एमएसएमई सेल्स), सिनियर मॅनेजर (एमएसएमई रिलेशनशिप), सिनियर मॅनेजर व मॅनेजर (क्रेडिट अॅनालिस्ट) अशा विविध पदांचा समावेश आहे. प्रत्येक पदासाठी रिक्त जागांची संख्या वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.

अर्जदार किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. याशिवाय एमबीए, पीजीडीएम, सीए, सीएफए किंवा सीएमए यांसारखी व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. संबंधित पदानुसार २ ते ८ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. अर्ज शुल्क सामान्य, ईडब्ल्यूएस व ओबीसी प्रवर्गासाठी ८५० रुपये तर एससी, एसटी, दिव्यांग, महिला व माजी सैनिकांसाठी १७५ रुपये निश्चित करण्यात आले आहे. शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल.

वयोमर्यादा पदानुसार बदलते. वरिष्ठ व्यवस्थापक पदासाठी साधारण २९ ते ३० वर्षे, व्यवस्थापक पदासाठी २५ ते ३४ वर्षे, तर काही पदांसाठी ३७ ते ४० वर्षांपर्यंत मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. कंत्राटी पदांसाठी सहाय्यक उपाध्यक्ष पदासाठी २६ ते ३६ वर्षे आणि सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी २२ ते ३२ वर्षे वयोमर्यादा आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयात सूट मिळेल.

Comments are closed.