बृहन्मुंबई महापालिकेत मेगा भरतीची तयारी; ९ हजारांहून अधिक पदांसाठी प्रक्रिया लवकरच! | BMC Recruitment for 9,000 Posts Soon!

BMC Recruitment for 9,000 Posts Soon!

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून लवकरच विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार असून त्यामध्ये Brihanmumbai Municipal Corporation (बृहन्मुंबई महापालिका) येथेही हजारो पदे भरण्याची तयारी सुरू झाली आहे. प्रशासनाकडून या संदर्भात आढावा घेण्यात येत असून रिक्त पदे भरून काढण्यासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.

BMC Recruitment for 9,000 Posts Soon!

राज्यात नव्या पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महापालिकेतील दीर्घकाळापासून रिक्त असलेली पदे भरावीत, अशी मागणीही करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काळात महापालिकेत मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महापालिकेत सध्या एकूण १ लाख ४५ हजार पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी फक्त ८९ हजार १३० पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. प्रशासनाने यापैकी ५६ हजार १२६ पदांना मान्यता दिली असून उर्वरित पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर सुमारे ९ हजार २९५ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी ५ हजार ४८६ पदांची भरती आधीच पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील विविध विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सरकारच्या स्तरावर बैठकही पार पडली आहे. लवकरच याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम बृहन्मुंबई महापालिका, विविध शासकीय विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिक्त पदे भरण्याला प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

महापालिका निवडणुकीनंतर ही प्रक्रिया गतीने सुरू होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने भरती केली जाईल. दरम्यान, महसुली खर्च कमी करण्यासाठी कर्मचारी रचनेचा पुनर्विचारही सुरू असून डिजिटल प्रणालीमुळे काही पदांची आवश्यकता कमी होऊ शकते, असा अंदाजही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भविष्यातील भरती प्रक्रिया अधिक नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Comments are closed.