लाडक्या बहिणींसाठी मोठा बदल!-Big Update for Ladki Bahin Scheme!

Big Update for Ladki Bahin Scheme!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेत सुरुवातीला मोठ्या प्रमाणात महिलांनी नोंदणी केली होती, मात्र आता पात्रतेच्या पडताळणीनंतर अनेक लाभार्थ्यांना वगळण्यात आले आहे.

Big Update for Ladki Bahin Scheme!या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे ७२ लाख महिलांना अपात्र ठरवून योजनेतून वगळण्यात आले आहे. सुरुवातीला सुमारे २.४७ कोटी महिलांना लाभ मिळत होता, पण नंतर प्रत्यक्ष तपासणीदरम्यान निकषात न बसणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले. यामध्ये काही चुकीच्या नोंदी तसेच पुरुष लाभार्थ्यांचाही समावेश होता.

आता सुधारित आकडेवारीनुसार केवळ १ कोटी ७५ लाख महिलांना दरमहा ₹१५०० चा लाभ मिळणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू झाली होती.

दरम्यान, KYC प्रक्रियेबाबतही महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. ज्या महिलांचे KYC अपूर्ण आहे किंवा त्यात त्रुटी आहेत, त्यांना दुरुस्ती करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र राहण्यासाठी महिलांनी या कालावधीत KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.

Comments are closed.