पोलीस भरतीत उमेदवारांना दिलासा!-Big Relief in Police Recruitment!

Big Relief in Police Recruitment!

सरकारनं पोलीस भरतीबाबत मोठा दिलासा दिलाय हं! पोलीस व्हायचं मनसुबे धरून बसलेले, पण वयोमर्यादेमुळं बाहेर राहिलेले उमेदवार आता अर्ज करू शकणार आहेत.

Big Relief in Police Recruitment!काय झालं तर, पोलीस भरती बराच काळ थांबली होती. कोरोना, राजकीय गोंधळ, आणि बाकी बऱ्याच कारणांनी ही भरती लांबली. त्या दरम्यान अनेक उमेदवारांचं वय मर्यादेपलीकडे गेलं. त्यांची अडचण ओळखून आता सरकारनं वयोमर्यादेत मुभा दिलीये.

ही भरती तब्बल १५,६३१ पदांसाठी आहे. यात पोलीस शिपाईची १०,९०८ पदं, चालकाची २३४, बँड्स मॅनची २५, सशस्त्र पोलीसाची २,३९३ आणि कारागृह शिपाईची ५५४ पदं आहेत.

उमेदवारांची मागणी होती की वयोमर्यादा वाढवावी. सरकारनं ती मागणी मान्य करून २०२२ ते २०२५ या काळात वयोमर्यादेमुळे थांबलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा दिलाय.

Comments are closed.