लाडकी बहिण योजनेतून दिलासा!-Big Relief in Ladki Bahin Yojana!

Big Relief in Ladki Bahin Yojana!

लाडकी बहिण योजनेबाबत राज्य सरकारकडून मोठं अपडेट समोर आलं असून अनेक लाभार्थी महिलांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. अडीच लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आर्थिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे.

Big Relief in Ladki Bahin Yojana!या योजनेअंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यात दर महिन्याला ₹1,500 इतकी आर्थिक मदत जमा केली जाते. मात्र पात्रतेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून काही अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर सरकारने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

अशा महिलांची नावे योजनातून वगळली जात आहेत, तर यावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. योजनेवर संकट येत असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना बंद होणार नाही, असे स्पष्ट वक्तव्य करीत महिलांना दिलासा दिला आहे.

सरकारने अपात्र लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी केवायसी पडताळणी अधिक काटेकोर पद्धतीने राबवण्यास सुरुवात केली असून खर्‍या लाभार्थ्यांपर्यंतच योजना पोहचवण्याचा सरकारचा हेतू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेवरचा संभ्रम दूर झाला असून पात्र महिलांना दिलासा मिळणार आहे.

Comments are closed.