राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांचा मिळून सुमारे ₹४५०० चा हप्ता एकाच वेळी खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जानेवारी २०२६ नंतर थांबलेले पैसे आता लवकरच मिळणार असल्याने महिलांची प्रतीक्षा संपणार आहे. मात्र, यासाठी e-KYC पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
सरकारने स्पष्ट केले आहे की, e-KYC न केलेल्या किंवा अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. अनेक अर्जांमध्ये त्रुटी आढळल्यामुळे काही महिलांना योजनेतून वगळण्यात आले आहे. ज्या महिलांच्या अर्जात चुका आहेत, त्यांना त्या दुरुस्त करण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे.
या योजनेअंतर्गत दरमहा ₹१५०० दिले जातात, पण केवळ त्या महिलांनाच लाभ मिळतो ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाखांपेक्षा कमी आहे. तसेच, घरात चारचाकी वाहन असल्यासही लाभ मिळणार नाही. निवडणुकीच्या काळात अपात्र महिलांनी घेतलेला लाभ आता e-KYC प्रक्रियेनंतर बंद होणार आहे.
दरम्यान, सरकारकडून या हप्त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असून लवकरच पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र, नेमके ₹१५०० येणार की एकत्र ₹४५०० येणार, याबाबत अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे. पुढील काही दिवसांतच याबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

Comments are closed.