राज्यातल्या शिक्षकांसाठी एकदम चांगली बातमी समोर आलीये. शिक्षकांच्या वर्षानुवर्षांच्या तक्रारींवर सरकारनं अखेर लक्ष दिलं आहे. शाळांमध्ये आधी चालणाऱ्या पंधरा समित्यांऐवजी आता फक्त चारच समित्या राहणार, त्यामुळे शिक्षकांना अध्यापनाला जास्त वेळ देता येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आता देशभरच्या शाळांत शिकवला जाणार आहे. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा शिकवणं आणि राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गाणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
याचबरोबर चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा सुरू होणार असून शैक्षणिक कामगिरीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठी बक्षिसं घोषित करण्यात आली आहेत.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं की शिक्षकांना अध्यापनाच्या मुख्य कामापासून दूर नेणारं अवांतर काम कमी करणं गरजेचं होतं. त्यामुळेच समित्यांची संख्या घटवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत शिवराज्याच्या इतिहासाला देशपातळीवर शिकवण्यासही हिरवा कंदील मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.

Comments are closed.