लाडकी बहीण योजनेला मोठा दिलासा!-Big Relief for Ladki Bahin Beneficiaries!
Big Relief for Ladki Bahin Beneficiaries!
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान ओटीपी न मिळण्याच्या अडचणीमुळे अनेक महिलांचे अर्ज प्रलंबित राहिले होते. ही अडचण लक्षात घेऊन सरकारने ई-केवायसीची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार असून, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करूनही ही प्रक्रिया पार पाडता येणार आहे. विशेषतः पती, वडील किंवा मुलाच्या आधारवर मोबाइल नोंद असलेल्या महिलांसाठी हा निर्णय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
मुंबईत सुमारे ३० हजार महिलांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण असून, शहर व उपनगरांतील अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ही प्रक्रिया गतीने पूर्ण केली जाणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र पाहणी मोहीमही सुरू करण्यात आली आहे.
विधवा, घटस्फोटित आणि एकल महिलांना या निर्णयामुळे मोठा आधार मिळणार असून, उत्पन्न पडताळणीसाठी वडील किंवा पतीच्या आधार क्रमांकाच्या तपासणीद्वारे लाभार्थ्यांची पात्रता निश्चित केली जाणार आहे.

Comments are closed.